Emerging Light from the Shadows
सर्वत्र अंधार आहे, जीवनाचं एक गूढ आकाश.
प्रत्येक क्षणात उभं राहतं संकट,
एक संपतं, दुसरं उगवतं,
जणू हेच असावं जीवनाचं चक्र,
एका प्रश्नातून बाहेर पडतो,
तर दुसरं आव्हान समोर उभं ठाकतं.
समजत नाही कसं हाताळावं हे सगळं,
मार्ग शोधायचा प्रयत्न करतोय,
पण प्रत्येक उत्तर केवळ नव्या प्रश्नाचं दार ठरलंय.
कधी कधी वाटतं,
हीच काय नियती आहे माझी?
अडचणींचं सर्पवेटाळ अंगणात मांडणं,
आणि त्या विषारी विचारांशी झुंजणं.
काही चेहरे आहेत, ओळखीचे,
त्यांचं अस्तित्व अधिक कठीण करणारं,
त्यांच्या हसण्यातही जाणवतो एक तिरस्कार,
पण ही लढाई माझीच आहे,
त्यांच्या बोलण्याने डळमळून जात नाही,
माझं मन घेरलेलं आहे संघर्षांनी,
तरीही या अंधारातून मार्ग शोधायचा आहे,
कुठेतरी एक उजेड आहे,
कुठेतरी एक आशेचा किरण दडलेला आहे.
आणि जेव्हा मी सर्व प्रश्नांना तोंड देईन,
सर्व संकटांना पार करीन,
तेव्हा मागे वळून बघेन,
आणि ज्यांनी या प्रवासात मला धक्का दिला,
त्यांच्या विरुद्ध माझा हक्काचा बदला घेईन.
त्या बदल्यात कदाचित सूड नसेल,
फक्त शांतता असेल,
एक समाधानाचं क्षण,
जिथे मी मोकळेपणाने श्वास घेईन,
सर्व गुंतागुंतींना मागे टाकून.
Post a Comment